Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडवणीसांचा ट्विटद्वारे महाविकास आघाडी मधील नेत्यांवर हल्लाबोल

Webdunia
रविवार, 30 जानेवारी 2022 (10:25 IST)
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधलाय.
 
महाराष्ट्र सरकारनं किराणा मालाच्या दुकानांमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासह इतर काही मुद्द्यांवर अमृता यांनी ट्वीट केलं आहे.
अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये "थोडक्यात उत्तर द्यावे - 50 मार्क्स" असं लिहून त्यापुढं तीन पर्याय दिले आहेत. त्यात "Naughty नामर्द, बिगडे नवाब आणि नन्हें पटोले" असे तीन पर्याय आहेत.
 
"या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर त्यांनी याद्वारे अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आहे.

<

थोडक्यात उत्तर द्यावे ...५० मार्क्स ;

Naughty नामर्द,
बिगड़े नवाब,
नन्हें पटोले .....
या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?

रिक्त स्थानो की पूर्ति करो ...५० मार्क्स !

_____शराब नही होती !
हरामख़ोर का मतलब _____है और
सुनने में आया है _____नामर्द है !#WakeUp #Confused

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 29, 2022 >तसंच, "रिकाम्या जागा भरा - 50 मार्क्स, असा प्रश्नही त्यांनी मांडला आहे. त्यात _____शराब नही होती !, हरामखोर का मतलब _____है आणि सुनने में आया है _____नामर्द है!" असे प्रश्नही अमृता फडणवीसांनी विचारले आहेत.
#WakeUp, #Confused अशा हॅशटॅगसह त्यांनी हे ट्वीट केले आहेत.
आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
 

संबंधित माहिती

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments