Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ रात्री 1.30 पर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

Webdunia
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (21:59 IST)
कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. मात्र हॉटेल, रेस्टॉरंट याना वेळेची मर्यादा दिली आहे. निर्बंधामुळे आधीच हॉटेल, रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात वेळेच्या बंधनामुळे आणखी नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा हटवून रात्री 1.30 पर्यंत ही पूर्ववत वेळ करावी, अशी मागणी हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने (hotel and restaurant association western india) मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांकडे केली आहे.
 
लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्रालासर्वाधिक फटका बसला आहे.आर्थिक नुकसानीमुळे देशातील 30 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद झाली आहेत. 20 टक्क्यांहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट अद्याप पूर्णपणे उघडलेली नाहीत आणि उर्वरित 50 टक्के रेस्टॉरंट तोट्यात आहेत. त्यामुळे पूर्ववत वेळ करण्याची मागणी कडून करण्यात आली आहे.
 
कमी व्यवसाय, वीजबिल, भाडे, कामगारांचा पगार, इतर खर्च या सर्वाचा विचार करता आताच्या परिस्थितीमध्ये हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालविणे अशक्य झाले आहे. व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पण ते अयशस्वी ठरत आहेत. सध्या लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राज्यातील सुमारे तीन कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नवीन रुग्ण संख्याही कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया (hotel and restaurant association western india president sherry bhatia) यांनी केली. दरम्यान, सरकारने सध्या सकाळी 7 ते रात्री 10 च वेळ दिली आहे ती हॉटेल व्यवसायासाठी योग्य नाही. वेळ वाढवून मिळाल्यास व्यवसाय अधिक चांगला होईल त्यासाठी आस्थापनेच्या परवाना वेळेनुसार आठवड्याचे सर्व दिवस रेस्टॉरंटची वेळ पूर्ववत करावी, असेही भाटिया यांनी सांगितले.

हॉटेल अँण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी  म्हणाले,हॉटेल, रेस्टॉरंटला सध्याची सकाळी 7 ते रात्री 10 ही वेळ पूरक नाही. सरकारने कोरोनापूर्व वेळेनुसार ती सुरू करावी.याशिवाय रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करण्याच्या अटीवर रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी शिथिलता द्यावीआणि प्रलंबित लसीकरण असल्यास ते क्रमाक्रमाने करण्याची परवानगी द्यावी असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

World Telecommunication Day 2024 :हा दिवस कधी आणि कसा सुरू झाला इतिहास जाणून घ्या

World Hypertension Day 2024 : जागतिक उच्च रक्तदाब दिवसकधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

पुढील लेख