Dharma Sangrah

भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर

Webdunia
बुधवार, 8 मे 2019 (18:36 IST)
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस कमी तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकऱ्यांना यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले. पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. ही भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तवली आहे. 
 
पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त, सार्वत्रिक पाऊस होणार नाही. दुसरा महिना चांगला पाऊस होईल. तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल. चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील. यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले. त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील, असा अंदाज आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशातील सर्वाधिक काळ पदावर राहिलेले नेते बनले, पवन चामलिंग यांना मागे टाकले

पुढील लेख
Show comments