rashifal-2026

बाईक रेसर, बाईक कोच चेतना पंडित यांची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 11 जुलै 2018 (16:44 IST)
बाईक रेसर, महिला बाईक कोच आणि 'रॉयल एनफिल्ड'च्या रोड कॅप्टन चेतना नागेश पंडित (२७) या मंगळवारी उशिरा आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. गोरेगाव इथल्या पद्मावती नगरमधील एका अपार्टमेंटमधल्या रुममध्ये फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. 
 
प्रेमप्रकरणात दुखावल्या गेल्यानंतर चेतनानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. घटनास्थळी एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडलीय. 'माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे' असा उल्लेख सुसाइड नोटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्यानंतर चेतना खुपच दुखावली गेली होती आणि नैराश्येत होती, असं तिच्या मैत्रिणींनी म्हटलंय. 
 
चेतना आणखीन दोन मुलींसह भाड्याच्या घरात गेल्या चार-पाच महिन्यांपासून राहत होती. घटना घडली तेव्हा रुममध्ये कुणीही उपस्थित नव्हतं. रुममेट घरी परतल्यानंतर वारंवार दरवाजावरची बेल वाजवूनही आतून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला... तेव्हा त्यांना चेतनाचा मृतदेह आढळला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

भारतातील पहिल्या डिजिटल जनगणनेबाबत एक मोठी घोषणा, पहिला टप्पा १ एप्रिलपासून सुरू होणार

थंडीच्या लाटेमुळे नऊ राज्यांना धोका, बाहेर पडणे महाग पडेल; आयएमडीचा इशारा

WPL 2026 च्या उद्घाटन समारंभात हनी सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस सादरीकरण करणार

काँग्रेस आणि एआयएमआयएमसोबत भाजपची युती काही तासांतच तुटली; भाजपने लाजिरवाण्या वक्तव्यानंतर आमदारांना नोटीस पाठवली

भारताची पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

पुढील लेख
Show comments