Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडापाव विक्रेत्या महिलेच्या अंगावर उकळते तेल सांडले…. गंभीर भाजलेल्या महिलेचा अखेर मृत्यू

Webdunia
बुधवार, 19 एप्रिल 2023 (22:16 IST)
नाशिक (प्रतिनिधी ) – दिंडोरीरोडवर भाजीबाजार परिसरात वडापाव विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडापाव तळत असताना उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील रगम तेल अंगावर सांडले. यात ही महिला गंभीर भाजली. आणि अखेर या व्यावसायिक महिलेचा मृत्यू झाला आहे. शुभदा अशोक लोखंडे (४६ रा. सप्ततारा रो हाऊस बोरगड, म्हसरूळ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडे यांचा म्हसरूळ गावातील भाजी मार्केट परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. २३ फेब्रुवारी रोजी त्या आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली होती. वडपाव तळत असतांना गॅसवर ठेवलेल्या उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील तेल त्यांच्या अंगावर सांडले.
 
या घटनेत त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तातडीने सिनर्जी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना मुंबईतील केईएम रूग्णालयात हलविण्यात आले होते. महिना भराच्या उपचारादरम्यान २८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments