Marathi Biodata Maker

नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी वीज बिल भरण्याची सक्ती करू नये - छगन भुजबळ

Webdunia
बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (14:50 IST)
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी कृषीपंपाचे थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
 
छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कृषिपंप वाहिनीवरील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून देताना संबंधित रोहित्रावरील सर्व कृषी ग्राहकांनी किमान रक्कम भरणे आवश्यक करण्यात आले आहे. २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास ३ हजार तर त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कृषी ग्राहकांनी ५ हजार रुपये भरल्याशिवाय रोहित्र बसविले जात नसल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
राज्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र रोहीत्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषीपंपाची थकीत वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी छगन भुजबळ यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मोफत पाणीपुरी देण्यास नकार दिल्याने दुकानदाराची हत्या

LIVE: माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला

हॉटेलमधील चुकीच्या खोलीत गेलेल्या नर्सवर मद्यधुंद तीन जणांकडून सामूहिक दुष्कर्म; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

IND vs SA यांच्यातील 5 वा T20 मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेला ८ जागा देऊ केल्या

पुढील लेख
Show comments