Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकात वाहतूक मार्गात बदल

Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2024 (09:55 IST)
रविवारी दि.१४ रोजी  जुने नाशिकमधून मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय, नाशिक रोड आणि अंबड परिसरातही जल्लोषात मिरवणूक काढली जाणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने शुक्रवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी करडी नजर असणार आहे. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक मार्गासंदर्भात वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नाशिक रोड आणि अंबड परिसरातील पाथर्डी फाटा या तीनही ठिकाणी मिरवणूक मार्ग दुपारी १२ वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त बच्छाव यांनी केले आहे. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद असले तरीही पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना आदेश लागू नाही, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
 
मुख्य मिरवणूक : भद्रकाली राजवाडा, वाकडी बारव, महात्मा फुले मार्केट-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-नेहरू गार्डनमार्गे शालिमार-शिवाजीरोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा.पर्यायी रस्ता : राजवाडा चौकातून सारडा सर्कल, द्वारकामार्गे इतरत्र.
– दिंडोरी नाका-पेठ फाटा-रामवाडी पूल-अशोकस्तंभ-मेहेरमार्गे सीबीएस व इतरत्र
 
सोहळा : पाथर्डी फाटा सिग्नल येथील डॉ. आंबेडकर पुतळा
पर्यायी रस्ते : गरवारे पॉइंटवरुन उड्डाणपूलामार्गे इतरत्र
– विजय ममता सिग्नल-द्वारका उड्डाणपूलामार्गे इतरत्र
– पाथर्डी गाव ते सातपूर ही वाहतूक पांडवलेणीकडून अंबड एमआयडीसीतून मार्गस्थ
– अंबड गावाकडील वाहतूक छत्रपती संभाजी स्टेडिअम-अंबड पोलिस ठाणेमार्गे इतरत्र
 
नाशिकरोड मिरवणूक
बिटको चौक-क्लालिटी स्वीट्स-मित्रमेळा कार्यालयासमोरुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-देवी चौकमार्गे डॉ. आंबेडकर पुतळा.
पर्यायी रस्ते : सिन्नर फाटा-उड्डाणपूलावरुन दत्त मंदिर चौक-सुराणा रुग्णालय-आनंदनगरी टी पॉइंटमार्गे इतरत्र
नाशिक-पुणे वाहतूक दत्त मंदिर सिग्नलवरुन उड्डाणपूलामार्गे इतरत्र. नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील बसेस सुभाष रोडमार्गे जातील. तर सीबीएसकडे जाणार्‍या बसेस नाशिकरोड न्यायालयासमोरुन मार्गस्थ होतील.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे विरोधकांना प्रतिउत्तर देत म्हणाले- लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये कोणतीही गडबड न्हवती

LIVE: फ्रॉड आहे EVM मशीन म्हणाले संजय राऊत

या देशात फ्रॉड आहे EVM मशीन, महाराष्ट्र निवडणूक निकालावर म्हणाले संजय राऊत

नागपुरात पार्क केलेल्या क्रेनला रिक्षाची धडक, दोन महिलांचा मृत्यू

ठाण्यामधील भिवंडी मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments