Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

शरद पवारांबद्दल ट्विटरवर बदनामीकारक मजकूर, 2 जणांविरोधात गुन्हा दाखल

Defamatory text
, बुधवार, 24 मार्च 2021 (07:41 IST)
बारामतीमध्ये दोन जणांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटरवर बदनामीकारक मजकूर लिहिल्याने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vedashree@vedashree_19 व Raje Harshvardhan Shastri या २ खातेधारकांबाबत बारामती तालुका पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांच्याकडून फिर्याद देण्यात आली आहे.
 
शरद पवार यांच्याविषयी वेदश्री नावाच्या एका मुलीने बदनामीकारक मजकूर लिहिला असल्याचे अजित कदम यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हि बाब अभिजित जाधव यांच्या निदर्शनास आणली. अभिजित जाधव आणि अजित कदम हे मित्र आहेत. तसेच शरद पवारांच्या छायाचित्रासह प्रसिद्ध केलेल्या या ट्विटला राजे हर्षवर्धन नावाच्या एका व्यक्तीने दिलेल्या प्रतिक्रियेतही पवार यांच्याबद्दल बदनामी केल्याचे जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिजित जाधव यांनी बदनामी करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, कोरोनाची 28 हजाराहून अधिक प्रकरणांची नोंद झाली