Festival Posters

अंगणवाडी सेविकांचा संप मागे

Webdunia
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (09:06 IST)

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंगणवाडी कर्मचा-यांच्या कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर संप घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी संप पुकारला होता. त्यानंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतल्याची माहिती कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली.

शमीम यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडीच्या बजेटमध्ये 40 कोटी रुपयांची भर टाकली आहे. महत्त्वाचे म्हणजे पोषण आहाराच्या मोबदल्यातही 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय सेविकांना किमान 6 हजार 500 रुपये मानधन मिळणार आहे. इतर सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार वाढ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

आप'मध्ये मोठी फूट, राघव चढ्ढा यांच्यासह अनेक खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला

मुंबईतील भाजप रॅली गोंधळ: वाहतूक कोंडीमुळे संतप्त महिलेचा मंत्र्यांशी वाद, अपमानास्पद भाषेचा वापर केल्याप्रकरणी तक्रार दाखल

Sachin Tendulkar Birthday: सचिन जावेद मियांदादच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले, कपिलचा झेल पकडता आला नाही

"ते झालमुरीचं वचन देत आहे, मी तुम्हाला भेळपुरी खाऊ घालेन," ममता बॅनर्जी यांचे भाजपवर टीकास्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकरला त्याच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या

पुढील लेख
Show comments