Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनंजय मुंडे यांचे म्हणणे आहे की “त्या’ शिवसेना नगरसेवकांना अटक करा

dhananjay munde
Webdunia
सोमवार, 4 मार्च 2019 (08:16 IST)
नवी मुंबईत उद्‌घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या वाद विकोपाला गेला आहे. या राड्यात राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीवर लोखंडी रॉड, कैचीने हल्ला केला होता. या प्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
 
पोलिसांनी सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली येत शहरातील वातावरण खराब करणाऱ्यांना पाठिंबा दिला असून पोलीस त्यांचे हुजरे झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हा हल्ला शिवसेना नगरसेवक करण मढवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांकरवी केला असल्याचा गंभीर आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. रबाले पोलीस ठाण्यात शनिवारी शिवसेना नगरसेवक एम के मढवी, नगरसेवक करण मढवी, नगरसेविका विनया मढवी, इतर तीन जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र हे गुन्हे मागे घेण्यात आल्याने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार संदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट घेत शिवसेना नगरसेवकांना अटक करण्याची मागणी केली.
 
आमदारांच्या गाडीवर हत्याराने हल्ला होवूनही जर पोलीस आयुक्त आरोपींना पाठीशी घालत असतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

राज्यभरात 4 हजार अनधिकृत शाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली

वसतिगृहातील मुलांवरील लैंगिक शोषण प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी केली राज्य सरकार कडे ही मागणी

नाशिक : डीजेच्या आवाजामुळे कानातून-तोंडातून रक्त येऊ लागल्याने तरुणाचा मृत्यू

LIVE: ‘शिंदेनी पुन्हा काळी जादू केली!’ आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

धुळ्यात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments