Dharma Sangrah

आरक्षणाला विरोध करणारे धनगर समाजाला काय आरक्षण देणार - धनंजय मुंडे

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (17:10 IST)

- आरक्षणाच्या लढाईत समाजाच्या खांद्याला खांदा देऊन लढेन, मुंडे यांनी दिली ग्वाही

ज्यांच्या इशाऱ्यावरून राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकार चालते त्या नागपूरच्या संघ कार्यालयातून प्रत्येक १५ दिवसाला देशातील आरक्षणे संपवण्याची भाषा केली जाते. जे आरक्षण संपवण्याची भाषा करतात ते धनगर समाजाला काय आरक्षण देणार, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे  यांनी केला आहे.
 

परभणीच्या खंडोबा बाजार मैदान परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने धनगर समाजाची चार वर्षांपासून फसवणूक केली आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची घोषणा करणा-यांना २०० बैठका होऊनही आरक्षण का देता आले नाही असा सवाल उपस्थित करतानाच आरक्षणाच्या या लढाईत मी धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून सर्वात पुढे असेल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची सरकारची घोषणाही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नाही तर त्यांनी समस्त मानवजातीसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम केवळ एका समाजाने न करता सर्व समाजाने एकत्र येऊन करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार  बाबाजी दुर्रानी , आमदार राहुल पाटील, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, विठ्ठलराव रबदाडे, प्रा. शिवाजी दळणकर, डॉ. विवेक नावंदर, दिनेश परसावत, संयोजक मारोतराव बनसोडे मामा आदी उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

प्रयागराजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळले

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत; राज ठाकरेंना काँग्रेससारखे धाडस दाखवण्यास सांगितले

मनोरुग्ण तरुणाच्या हल्ल्यात दोन वृद्धांचा मृत्यू, संतप्त जमावाने आरोपीला केली मारहाण; वर्धा मधील घटना

पालघर: साप तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक, वाहन आणि सरपटणारे प्राणी जप्त

पुढील लेख
Show comments