Festival Posters

नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणसं आतमध्ये - एकनाथ खडसे

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017 (12:00 IST)
भाजपा जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपातील अंतर्गत वादावर पुन्हा तोफ डागली आहे. भाजपने त्यांच्या सहकारी वर्गाला डावलून ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांचे कसे लाड सुरु आहेत यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपात इतकी वर्ष सेवा केली त्याचे काय फळ अनेकांना मिळाले असा प्रश्न विचारत खंत व्यक्त केली आहे. भाजपात  नारायण राणेंसारखे ‘त्यागी’ नेते पक्षामध्ये येत आहेत, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली.
 
धुळे जिल्ह्यात ‘आणीबाणी चिंता आणि चिंतनाचा विषय’ या पुस्तकाचं प्रकाशनया ठिकाणी  एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
खडसे म्हणाले की “आमच्या पक्षामध्ये असं झालंय की, ज्यांनी आयुष्य घालवलं पक्षामध्ये, ज्यांनी सत्ता आणली ते बाहेर आणि नारायण राणेंसारखी ‘त्यागी’ माणसं आतमध्ये. मी मुद्दामहून श्याम जाजू साहेबांसमोर सांगतोय.”, भाजपा मध्ये जे अनेक जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सत्तेत सहभागी करून न घेतल्याने अनेक नाराज आहेत. निवडणुकीत हा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

प्रयागराजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळले

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत; राज ठाकरेंना काँग्रेससारखे धाडस दाखवण्यास सांगितले

मनोरुग्ण तरुणाच्या हल्ल्यात दोन वृद्धांचा मृत्यू, संतप्त जमावाने आरोपीला केली मारहाण; वर्धा मधील घटना

पालघर: साप तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक, वाहन आणि सरपटणारे प्राणी जप्त

पुढील लेख
Show comments