Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्यावधी निवडणूक तूर्त होईल असं वाटत नाही : एकनाथ खडसे

Webdunia
रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (09:42 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं आहे (Eknath Khadse on Midterm elections in Maharashtra). तूर्तास तरी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असं वाटत नसल्याचं मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं. ते भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनात बोलत होते. 
 
एकनाथ खडसे म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर मतांतरं आहेत. आता ही मतांतरे उघडपणे होत असून वाढायला लागले आहेत. या अंतर्गत विरोधामुळेच हे सरकार मोडेल. असं असलं तरी मध्यावधी निवडणूक तूर्त होतील असं मला वाटत नाही. त्यांनाही काही काळ द्यावा लागेल. मी माझ्या पक्षावर कधीही टीका केली नाही. माझी टीका एखाद्या वेळी व्यक्तीवर असू शकते. मी पक्षात सक्रीय आहे.”
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मध्यावधी निवडणुकांवर भाष्य केलं होतं. त्यांनी भाजप महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची तयारी करणार असल्याचं वक्तव्यं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचं मध्यावर्ती निवडणुकांवरील हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. भाजपमध्येच मध्यावधी निवडणुकांवरुन दोन वेगळी मतं असल्याचंही या निमित्ताने समोर येत आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी भाजपला संघटनात्मक कामावर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.
 
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
 
“महाविकास आघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल. भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी सुरु करणार आहे”, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
 
दरम्यान, नवी मुंबईत नेरुळमध्ये सकाळी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 16 फेब्रुवारीला जे. पी. नड्डा हे देखील अधिवेशनाला हजर राहणार आहेत. यावेळी जे. पी. नड्डा हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या राज्यव्यापी अधिवेशनात महाराष्ट्रातील भाजपचे खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक सहभागी होणार आहेत. अधिवेशनात 10 हजाराहून अधिक पदाधिकारी उपस्थित असतील असा दावा भाजपने केला आहे.
 
भाजपचे चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. तसेच, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

भारतीय क्रिकेटपटूचे पुण्यात आकस्मिक निधन, कारण ऐकून मित्रांना धक्का बसला

बाबा वांगाची 3 भीतीदायक भविष्यवाणी व्हायरल!

सीमेवरून माघार घेण्याच्या करारावर चिनी लष्कराचे हे मोठे विधान-राजनाथ सिंह

कर्करोग बरा करण्याचा उपाय सांगून सिद्धू अडकले , 850 कोटींचा केस दाखल

EPFO 3.0 मध्ये मोठे बदल होणार आहेत, तुम्ही ATM मधून PF चे पैसे काढू शकाल

पुढील लेख
Show comments