rashifal-2026

शिक्षक भरतीसाठी परीक्षा येत्या १२ डिसेंबरपासून

Webdunia
मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:21 IST)
राज्यभरातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेला येत्या १२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी २४ नोव्हेंबरपर्यत राज्यभरातून २ लाख ३३ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

शासनाकडून घेण्यात येणारी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा १२ ते २१ डिसेंबरदरम्यान आॅनलाइन होणार आहे. राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्याचे नियोजन शासनाने केले असले तरी शिक्षक भरतीसाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत, याची शासनाने आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. 

या भरतीसाठी शासनाने अद्ययावत पद्धत वापरली आहे. शिक्षणसेवक व शिक्षक भरतीसाठी सरल पोर्टलद्वारे असलेल्या विद्यार्थी संख्येनुसार संचमान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना मान्यताच मिळणार नाही. तसेच रिक्त जागांची माहिती मिळताच अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन केले जाणार आहे. बिंदूनामावलीसाठी 'पवित्र' हे पोर्टल सुरू केले आहे. पद भरतीची जाहिरात या पोर्टलवर द्यावी लागणार आहे. सदर जाहिरात १५ दिवस राहणार असून दोन वर्तमानपत्रातून प्रकाशित करावी लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या निधनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

अजित पवार महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता जाणून घ्या?

या दिग्गजांचे अकाली निधन झाले: जेव्हा विमान अपघातांनी देशाचे राजकारण बदलले, तेव्हा या प्रमुख नेत्यांचा दुःखद मृत्यू झाला

उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्या विमानात होते, आणखी कोण कोण होते त्यात, संपूर्ण माहिती जाणून घ्या

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments