Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात महिलेचा उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (21:26 IST)
बारामती शहरातीलएका बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. आत्महन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला आत्मदहन करण्यापासून रोखले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने बारामती शहरातील बड्या उद्योजक तसेच नगरपीषदेचा माजी पदाधिकारी याच्या विरोधात 13 वर्षे शोषण केल्याचा आरोप केला आहे.हा माजी पदाधिकारी उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी आहे.महिलेने केलेल्या आरोपासंबंधित प्रकरण हे पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.परंतु पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप महिलेने केला.या महिलेने सोमवारी (दि.15) सकाळी दहाच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.
 
पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन  करीत मतपरीवर्तन केले. यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणार नसल्याचे महिलेने लेखी लिहून दिले आहे.महिलेसंबंधित प्रकरण बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.या महिलेला पोलीस पुण्यात नेऊन सोडणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद कायदा आणणार, 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले

महाराष्ट्र सरकार ने लव्ह जिहाद कायदा आणण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले

महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायद्यावर संजय राऊतांनी केली टीका

राजस्थान येथील भारत - पाक सीमा लगत असणाऱ्या श्री तनोट राय माता मंदिर येथे साजरी होणार यंदा शिवजयंती.....

उपराष्ट्रपती यांनी कटरा येथे पोहोचून माता वैष्णोदेवीचे आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments