Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कणकवलीतील हल्ला प्रकरणी चारजणांना अटक; कोकणातील राजकारण तापले

Webdunia
सोमवार, 20 डिसेंबर 2021 (15:09 IST)
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर हल्ला करणार्‍या चौघा हल्लेखोरांना कारसह पोलिसांनी पकडले असून हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात वापरलेली इनोव्हा कार (MH 14 – BX 8326) फोंडाघाट चेकपोस्टवर पोलिसांनी पकडली. त्यानंतर आतील चारही संशयितांना ताब्यात घेत ओरोस पोलीस स्टेशनला आणण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चारही आरोपींची बंद दरवाजाआड कसून चौकशी केल्याचे समजते. मात्र, चौकशीचा तपशील समजू शकलेला नाही. दरम्यान, पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
परब वरील हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून भाडोत्री गुंडांनी केल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी जखमी परब यांची विचारपूस केली होती. या हल्ल्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यातच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी परब यांच्यावरील हल्ला हा पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील राजकीय वादातून झाल्याचे सांगितले.
 
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या चार नगरपंचायत निवडणुका आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, चारही आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा : केसरकर
काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांनी तत्कालीन काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या नावावर घेतलेल्या बोलोरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणी तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा बॅक अध्यक्ष राजन तेली यांची ठाणे पोलीसाच्या अर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून हा तपास सिंधुदुर्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र हा तपास राज्याच्या स्तरावर केला जावा तसेच पोलिसांनी कणकवली हल्ल्यामागील सूत्रधार शोधावा अशी मागणी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सीएम केजरीवाल यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, वजन 8 किलोने घटले

भारतीय टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला

ना पाणी, ना सावली; शेकडो हज यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू, सौदी अरेबियात नेमकं काय घडलं?

NEET पेपर लीक प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघरमधून 6 जणांना अटक केली

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरु

सर्व पहा

नवीन

GST Council: रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट आता जीएसटीच्या कक्षेबाहेर,अर्थमंत्र्यांची घोषणा

भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

NEET PG 2024 : NEET PG 2024 ची परीक्षा उद्या आहे, परीक्षा हॉलमध्ये काय घेऊन जावे आणि काय घेऊ नये जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा लढवणार संजय राऊतांनी सांगितले

Paris Olympics: श्रेयसी सिंग भारतीय नेमबाजी संघात सामील

पुढील लेख
Show comments