Dharma Sangrah

लग्नावरून परतताना अपघातात चौघांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 27 मार्च 2023 (13:01 IST)
काळ कधी आणि कसा झडप घालेल हे कोणीही सांगू शकतं  नाही. लग्नसमारंभ म्हटले की सर्वत्र आनंदी वातावरण असते. मात्र कधी कधी या समारंभात गालबोट देखील लागते. नातेवाईकांच्या मुलाचे लग्न करून परत येताना अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात चलबुर्गा पाटी जवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पुण्याहून निलंगाचे बडूरकर कुटुंब नातेवाईकांकडे लग्नावरून गावी आपल्या वाहनाने निघाले. लग्नानंतर दोन वाहने निघाली असताना एकातनवरा नवरी होते तर दुसऱ्या वाहनांत व्हराडी होते .नवरा नवरी या अपघात सुखरूप असल्याचे समजले तर दुसऱ्या वाहनाचा अपघात गावी परत जात असताना औसा तालुक्यात चलबुर्गा पाटी जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पुलाखाली पालटून झाला. या अपघात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अंश किरण बडूरकर, जय सचिन बडूरकर, अमर सचिन बडूरकर आणि प्रकाश कांबळे अशी मयतांची नावे आहेत. तर जान्हवी सचिन बडूरकर, यश किरण बडूरकर, गोदावरी सचिन बडूरकर आणि सचिन दिगंबर बडुरकर हे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्युमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

मुंबईत महिलांचा छळ केल्याप्रकरणी सराईत विनयभंग करणाऱ्याला अटक

महाराष्ट्रातील धुळे येथे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचे रॅकेट; पोलिसांनी दोन व्यापाऱ्यांवर कारवाई केली

LIVE: महाराष्ट्रात ऑटो परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश

अशोक खरात यांच्याशी संबंधित आणखी एक घोटाळा, १२ वी एफआयआर दाखल

नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित चकमक, दोन गटात संघर्षात तिघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments