Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वणी हादरलं, 42 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार!

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:20 IST)
जिल्हा सामूहिक बलात्काराने हादरला आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीच्या वणीमध्ये (Vani) एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी पीडित महिलेवर बस स्टॉपमध्येच (Bus Stop) बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) चार जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील वणी येथील बस स्थानकावर 42 वर्षीय पीडित महिला आणि तिचा मित्र बसले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या चौघांनी पीडित महिला आणि तिच्या मित्राला जीवे मारण्याची धकमी दिली. त्यानंतर त्यांनी आळीपाळीने पीडित महिलेवर बलात्कार केला. बुधावारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने वणी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
 
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत चौघांनाही बेड्या ठोकल्या. चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरु आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्हा हादरला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर माजी हॉकीपटू पीआर श्रीजेश झाले भावूक

भारताचा अर्शदीप सिंग 2024 चा सर्वोत्कृष्ट पुरुष T20 खेळाडू बनला

LIVE: बाबूराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

बाबूराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल,अजित पवारांनी दिले हे आदेश

अयोध्येला भेट देण्यासाठी आलेल्या दोन वृद्ध भाविकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments