Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विदर्भात येत्या ४८ तासांमध्ये पुन्हा गारपीट होण्याची शक्यता

Webdunia
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018 (09:49 IST)

येत्या ४८ तासांमध्ये विदर्भामध्ये विशेषत: अमरावती आणि नागपूर विभागात ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता  हवामान खात्याकडून वर्तवलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाने मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, वीजेपासून व गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि गारपीटीपासून स्वत:सह गुरा-ढोरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. सोबतच  मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून ही माहिती सर्व संबंधित जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दूरध्वनी, व्हॉटसअप, एसएमएस व इमेलद्वारे तातडीने कळविण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

LIVE: संविधानिक संस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय म्हणाले शहजाद पूनावाला

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments