rashifal-2026

हिंदूंच्या सणांनाच आडकाठी का? : राज

Webdunia
गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (12:29 IST)
मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
 
महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मंगळवारी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरे यांनी गिरगावला भेट दिली.
 
गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली 60 ते 70 वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आताच याबाबत तक्रार आली, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

पीएनबीची १०.१४ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने एका खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

बारामतीमध्ये अजित पवार यांच्या स्मारकाच्या घोषणेनंतर राजकीय आणि कौटुंबिक गोंधळ

LIVE: बारामतीमध्ये अजित पवार यांच्या स्मारकाच्या घोषणेनंतर राजकीय आणि कौटुंबिक गोंधळ

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

पुढील लेख
Show comments