Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकीच्या निकालात जनतेने संयुक्त पुरोगामी महाआघाडीला कौल दिला

Webdunia
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019 (09:04 IST)
"काल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आला. महाराष्ट्रात महाआघाडीला ११२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागांवर यश आले आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत १६.७१ टक्के मतदान मिळाले. राष्ट्रवादीला ९२ लाख १६ हजार ९११ इतके मतदान झाले जे शिवसेनेपेक्षा २ लाखांनी जास्त आहे. भाजपला सरकार जनतेने खरा महाजनादेश दाखवला, सत्तेचा माज उतरवला. आमची खंत आहे की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काही मीडियाने भाजप बहुमताने जिंकत असल्याचा पोल दाखवला. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे भाजपची सत्ता जाताजाता राहिली."
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक  बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने संयुक्त पुरोगामी महाआघाडीला कौल दिला त्या पार्श्वभूमीवर यांनी आज मुंबईतील क्लर्क हाउस येथे पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले,
 
"सरकार आधीपासूनच अकार्यक्षम होते फक्त जाहिरातीच्या माध्यमातून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न होत होता. युतीला बहुमत मिळाले मात्र कार्यालयांमध्ये शुकशुकाट आहे. आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला तरी आमच्यात उत्साह आहे. कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आहे.
 
मोदी शाह जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचे उमेदवार पडले. कार्यकर्त्यांना वाटत होते की आता मोदी आले की जादूची कांडी फिरवेल मात्र मोदी लाट ओसरली आहे. तरुणांना रोजगार नाही, शेतकरी हवालदिल, पूरग्रस्तांना मदत नाही यामध्ये सरकार कुठेच दिसले नाही म्हणून त्यांचा पराभव झाला.
 
उदयनराजे यांनी मंत्री असताना स्वतःचे नाव ७-१२ मध्ये टाकून जागा लाटल्या आणि त्या भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी ते कॉलर टाईट करून भाजपात गेले. जयदत्तही शिवसेनेत गेले. मात्र लोकांनी फोडाफोडीचे राजकारण नाकारले.
 
सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत पण पवार साहेबांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणूनच आम्ही काम करणार."
 

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments