Festival Posters

त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली असती तरी चाललं असतं -आदित्य ठाकरे

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (08:02 IST)
माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातून बाहेर जात असलेल्या उद्योगांबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारचे वाभाडे काढले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे यांनी पुराव्यांसह सडेतोड उत्तर दिलं. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का जात आहेत? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देणं अपेक्षित होतं. त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली असती तरी चाललं असतं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसंच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं.
 
दुसरीकडे, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन करणाऱ्या तरुणांचा उल्लेख ‘शेंबडी पोरं’ आणि पत्रकारांचा उल्लेख ‘एचएमव्ही’ असा केला. या विधानाचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. दोन्ही विधानांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी आपला शब्द मागे घ्यावा आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात ऑटो परवान्यांची तपासणी करण्याचे आदेश

धनबादमध्ये सिलेंडर स्फोटात तिघांचा मृत्यू

नागपूरात बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला

बारामती-राहुरी पोटनिवडणुकीवरून शिवसेना यूबीटीमध्ये दोन गट पडले

मुंबईत महिलांचा छळ केल्याप्रकरणी सराईत विनयभंग करणाऱ्याला अटक

पुढील लेख
Show comments