Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Karnataka : घटस्फोटित महिलेला फसवून बाळ विकले

Webdunia
मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (13:55 IST)
घटस्फोटित महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करून तिच्या 1 वर्षाच्या बाळाला विकण्याचा धक्कादायक प्रकार घडला कर्नाटकातील हुबळी येथे घडला असून बीड मध्ये हे प्रकरण समोर आले आहे. 
 
माजलगाव तालुक्यातील गोवर्धन पाटी येथे राहणाऱ्या एका महिलेचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले असून तिला एक वर्षाचे मूल आहे. तिचा घटस्फोट झाला असून पती पासून विभक्त ती तिच्या आई वडिलांकडे राहते. महिलेच्या मामाने तिची ओळख छाया नावाच्या महिलेशी करून दिली. तिची चांगली ओळख झाल्यावर 18 सप्टेंबर रोजी छाया महिलेच्या घरी आली आणि तिने सोबत किशोर वासुदेव भोजने नावाच्या व्यक्तीला आणले होते. हा माझा मानलेला भाऊ असे तिने सांगितले. या दोघांनी महिलेला दुसरं लग्न लावून देण्यासाठी तयार केलं. आणि तिच्या मुलाची सोय  देखील करण्याची  शाश्वती दिली. 

त्याच दिवशी ते माजलगावातून कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. छायाने आपल्या मुलीला सोबत नेले. कोल्हापूरातून छायाने एका महिलेला फोन केला नंतर त्यांनी बेळगावला भेटण्याचे  ठरविले. बेळगावला गेल्यावर ललिता आणि दीपक नावाची व्यक्ती त्यांना न्यायला आली.

नंतर रात्री त्यांनी आपसात चर्चा करून सर्वजण  सकाळी कर्नाटकातील हुबळीला गेले तिथे एका चारचाकीतून एका दाम्पत्य आले आणि महिलेच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन छायाने मुलाला दाम्पत्याला 50 हजारात विकले. नंतर ते गोव्याला गेले. परत येताना  एका पोलीस महिलेला त्यांच्यावर संशय आला. त्यांनी चौकशी केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. छाया आणि किशोर या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात सादर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुलगाममध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, 4 दहशतवादी ठार

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

सर्व पहा

नवीन

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

पुढील लेख
Show comments