Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्नाटक सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा : छगन भुजबळ

Webdunia
गुरूवार, 15 डिसेंबर 2022 (08:58 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारचा चांगला समाचार घेतला असून कर्नाटक सरकारच्या चोराच्या उलट्या बोंबा सुरू असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. बेळगाव, कारवार राहिलं बाजूला आणि जत आणि अक्कलकोट मागायला लागले अशी उपरोधिक टीका त्यांनी कर्नाटक सरकारवर केली आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत चौफेर फटकेबाजी केली असून राज्यातील विविध घडामोडींवरती त्यांनी भाष्य केले आहे.
 
काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार 2.0 ची घोषणा केली. याबद्दल विचारले असता छगन भुजबळ म्हणाले, जलयुक्त शिवार ने काय फायदा झाला? त्यात काही त्रुटी आहेत का? सुधारणा करायला वाव आहे का? याचा आढावा घ्यायला हवा विचार करायला हवा असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी इथे व्यक्त केले.
 
मविआचा महामोर्चा
महाविकास आघाडीच्यावतीने 17 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये महामोर्चा निघणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. लाड साहेबांनी तर आमचा इतिहासच बदलून टाकला. शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं लाड बोलले. सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांचा होणाऱ्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी महामोर्चाच्या आयोजन करण्यात आला आहे. राज्याचे प्रकल्प गुजरातला गेले, तरुणांचा रोजगार बुडाला, महागाई, कर्नाटक सीमावाद अशा अनेक प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 
छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधला असून ते म्हणाले, गुजरात निवडणुका आल्या आणि आमचा फॉक्सकॉन गेला आणि आम्हाला सांगितलं तुम्हाला पॉपकॉर्न देतो. असे म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारसह केंद्रावर निशाणा साधला.
 
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, मोदींची जादू कायम असती तर दिल्ली आणि हिमाचलमध्ये अन्य पक्षांना बहुमत कसं मिळाला असत? असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे. मोदींची जादू नाही ते आता समोर येतंय असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
 
कर्नाटक सरकारवर निशाणा
छगन भुजबळ सीमा वादावरून म्हणाले, मी बेळगाव, कारवारला गेलो त्यावेळी सहा ते सात लोकांचा बळी गेला होता. कर्नाटक सरकारचा चोराच्या उलट्या बोंबा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बेळगाव कारवार राहिलं बाजूला आणि आता जत अक्कलकोट मागायला लागले अशी उपरोधिक टीका त्यांनी करणाऱ्या सरकारवर केली आहे. तसेच महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वादावर गृहमंत्री अमित शहा घेत असलेल्या बैठकीत फार मोठा दिलासा मिळेल असं वाटत नाही असे भुजबळ यांनी सांगितले.
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

अरबी समुद्रात 500 किलो ड्रग्ज जप्त, भारतीय नौदलाने केली मोठी कारवाई

LIVE: नव्या मुख्यमंत्री बाबत एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

नवा मुख्यमंत्री कधी जाहीर होणार? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

12 विभाग, विधान परिषदेचे अध्यक्षपद; एकनाथ शिंदे यांनी अमित शहांसमोर या 4 मोठ्या मागण्या ठेवल्या

चालत्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments