rashifal-2026

विधान परिषद निवडणुक, उद्धव ठाकरे यांचा अर्ज दाखल

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (15:27 IST)
विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल केला आहे. विधीमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सोपवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही होत्या. तसंच आदित्य ठाकरेही होते.
 
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे ५ तर भाजपाचे ४ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दोन उमेदवार दिल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र तो सुटला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली खरी, मात्र ते विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नव्हते. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. 
 
नऊ रिक्त जागांसाठी निवडणूक, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे-शिवसेना
नीलम गोऱ्हे-शिवसेना
राजेश राठोड-काँग्रेस
राजकिशोर मोदी-काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील-भाजपा
गोपीचंद पडळकर-भाजपा
प्रवीण दटके- भाजपा
डॉ. अजित गोपचडे-भाजपा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा! जाणून घ्या काय स्वस्त झाले

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 LIVE: अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

3 नवीन आयुर्वेदिक एम्स, 5 प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे आणि परवडणाऱ्या औषधांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारची कर्तव्ये स्पष्ट केली

प्रसिद्ध क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांना एसआयआर नोटीस

पुढील लेख
Show comments