Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, कधीही अटक होऊ शकते

Webdunia
मंगळवार, 3 मे 2022 (13:05 IST)
महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते. खरे तर, 6 एप्रिल रोजी शिराळ्याच्या दंडाधिकारी न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 
 
 सांगलीच्या शिराळा येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात 2008 च्या खटल्याच्या संदर्भात भादंवि कलम 143, 109, 117, 7 आणि मुंबई पोलिस कायद्याच्या 135 अंतर्गत अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 
 
न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलीस आयुक्तांच्या अजामीनपात्र वॉरंट अंतर्गत अटक करण्याचे आदेश दिले होते. मात्र, असे असूनही मुंबई पोलिसांनी अद्याप अटकेची कार्यवाही केलेली नाही. 
 
मात्र, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. राज ठाकरे यांना एका जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी वॉरंट बजावल्यानंतरही राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, अशी विचारणाही न्यायालयाने पोलिसांना केली.
 
काय प्रकरण होते
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर दगडफेक केली होती. खरे तर २००८ मध्ये रेल्वेत परप्रांतीय तरुणांच्या भरतीवरून राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली होती. अंबाजोगाईतही एसटी बसला लक्ष्य करण्यात आले.
 
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नाहीत. जामीन मिळूनही सलग तारखांना हजर न राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments