Festival Posters

महाजन बंधू यांची साहसी 'सी टू स्काय' मोहिम काठमांडू पर्यंत सायकलिंग

Webdunia
शनिवार, 16 मार्च 2019 (09:07 IST)
'सी टू स्काय' या अनोखी  आणि साहसी मोहिम दिवंगत क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्माराज बाम आणि नाशिकचा सायकलप्रेमी दिवंगत जसपालसिंग विर्दी (अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन) यांना समर्पित केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत असावी या उद्देशाने सीपीआर CPR (Cardio Pulmonary Resuscitation) तंत्राविषयी जनजागृती करणे - जीवन संजीवनी उपक्रम असून याद्वारे प्रत्येक मनुष्याला जीवन वाचविण्यासाठी सज्ज प्रशिक्षित करणे असे मोहिमेचे उद्देश असणार आहे.
 
अशी असेल मोहीम : मुंबई (समुद्र सपाटीपासून) ते काठमांडू पर्यंत सायकलिंग + ट्रेकिंग (एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत) + गिर्यारोहण (माउंट एव्हरेस्ट सर करणे 29028 फूट, स्काय लेवल)
 
असे असेल मोहिमेचे वेळापत्रक :
 
A) सायकल प्रवास आणि जीवन संजीवणीची माहिती देण्यात येणार आहे अशा ठिकाणांची यादी अशी आहे :
 
31 मार्च : गेटवे ऑफ इंडिया, मुंबई
सकाळी 6 वाजता : जीवन संजीवनी CPR सीपीआर तंत्राची माहिती आणि प्रात्यक्षिक
सकाळी ठीक 7 वाजता प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात
साडेआठ वाजता सरदार तारा सिंग उद्यान, मुलुंड, ठाणे
दुपारी एक वाजता पाथर्डी फाटा, नाशिक येथे आगमन, पुढे दीड वाजेपर्यंत हॉटेल बीएलव्हीडी, त्र्यंबकेश्वर रस्ता पर्यंत सायकल रॅली, तेथे सीपीआर प्रात्यक्षिक, ठीक अडीच वाजता धुळ्याकडे प्रयाण
रात्री साडेआठ वाजता धुळे शहर आणि पुढे इंदूर येथे 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता आगमन तसेच सीपीआर प्रात्यक्षिक आणि मुक्काम.
2 एप्रिल रोजी इंदूर येथून पुढील प्रवास. भोपाळ येथे दुपारी 2 वाजता पोहचून तेथे सीपीआर प्रात्यक्षिक, सागर येथे मुक्काम
3 एप्रिल रोजी सागर येथून झाशी कडे प्रयाण, झाशी येथे सीपीआर प्रात्यक्षिक, आणि पुढे कानपुर पर्यंत राईड करून शहरात मुक्काम
4 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता सीपीआर प्रात्यक्षिक करून लखनऊ कडे रवाना. लखनऊ येथे दुपारी 2 वाजता पुन्हा सीपीआर प्रात्यक्षिक आणि पुढे बस्ती येथे मुक्काम ,5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता प्रवास सुरू करून नेपाळची सीमारेषा. येथून प्रवासादरम्यान बुतवाल आणि भारतपूर येथे सीपीआर प्रात्यक्षिक करून काठमांडू येथे मुक्काम ,6 एप्रिल सकाळी 10 वाजता काठमांडू येथे सीपीआर प्रात्यक्षिक ,
 
B) ट्रेकिंगचे वेळापत्रक
8 एप्रिल रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पोहचण्यासाठी ट्रेकिंगला सुरुवात, पुढील 9 दिवसात एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पोहचण्याचा प्रयत्न ,C) काही काळ थांबून एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर वातावरण अनुकूल होताच एव्हरेस्ट शिखर सर करण्यास प्रारंभ ,C) Acclimatisation and climbing to the summit as we get a favourable weather window.
 
बेस कॅम्प येथेपर्यंत ट्रेकिंग करताना आणि बेस कॅम्प येथील मुक्कामादरम्यान येथील स्थानिक नेपाळी नागरिकांना, शेर्पा अर्थात सीमाभागात राहणाऱ्या व गिर्यारोहणात पारंगत असलेल्या तसेच एव्हरेस्ट सर करण्यासाठी जगभरातून आलेल्या सर्व गिर्यारोहकांना सीपीआर/ जीवन संजीवणीचे प्रात्यक्षिक आम्ही करून दाखवणार आहोत.
 
या मोहिमेसाठीची अशी झाली तयारी : या मोहिमेसाठी आम्ही जोरदार तयारी केली आहे. 22 किलो वजनाच्या ओझ्यासह सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक उंच शिखरे आम्ही पादाक्रांत केली. नाशिक जिल्ह्याचा अभिमान यासाठी की अशी उतुंग शिखरे पार करण्याचा अनुभव आम्हाला आमच्या घरातच मिळाला आहे.डॉ. पिंप्रीकर स्पोर्ट्समेड रिहाब सेंटर येथे कठीण परिस्थितीत तग धरण्यासाठी मिळालेलं प्रशिक्षण आणि सायकलिंगची केलेला रोजचा सराव हे सर्व महत्वाचे ठरणार आहे.या मोहिमेसाठी अंदाजे 70 लाखांचा खर्च अपेक्षित असून ही मोहीम आपले सहकार्य, आशीर्वाद आणि देणग्या यांशिवाय वास्तवात येणार नाही. म्हणूनच आम्ही आपणास उदारहस्ते मदत करण्याचे आवाहन करीत आहोत.आम्ही आमच्या प्रयत्नात नक्कीच यशस्वी ठरू अशी आम्हाला खात्री असून आपण प्रत्येकाचे सहकार्य आणि आशीर्वाद गरजेचे आहेत.या उपक्रमाविषयी प्रत्येक माहिती महाजन बंधू सायकलिस्ट या महाजन बंधू फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक पानावरुन दिली जाणार आहे. या रॅलीमध्ये कोणास कुठल्याही शहरातून सहभागी व्हायचे असल्यास त्यासाठी गूगल फॉर्मची लिंक देऊन त्याठिकाणी नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सीपीआर (जीवन संजीवनी) प्रात्यक्षिक पूर्ण करण्याबद्दल सर्टिफिकेटही देण्यात येणार आहे. तसेच रिफ्लेक्टर जॅकेट किंवा सायकलिंग जर्सीची मागणी करून आपण महाजन बंधू फाउंडेशनला ₹501किंवा ₹1501 या स्वरूपात देणगी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे विशेष सहकार्य यासाठी लाभत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Assembly Election Results 2026 Live विधानसभा निवडणूक निकाल २०२६

Puducherry Assembly Election Results 2026 Live : पुडुचेरी विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती

Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live: तामिळनाडू विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती

Kerala Assembly Election Results 2026 Live : केरळ विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती

Assam Assembly Election Results 2026 Live : आसाम विधानसभा निवडणूक परिणाम २०२६, पक्ष स्थिती

पुढील लेख
Show comments