Festival Posters

नगराध्यक्षांकडून अभियंत्याला मारहाण ! सीसीटीव्हीमध्ये चित्रित…

Webdunia
बुधवार, 6 एप्रिल 2022 (15:06 IST)
सांगितलेले काम वेळेत केले नाही म्हणून नगराध्यक्षांचा पारा चढला आणि त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केली. दालनात सुरू झालेली धक्काबुक्की बाहेरपर्यंत आली.शेवटी महिला मुख्याधिकारी मध्ये पडल्या आणि त्यांनी मोठ्या धाडसाने वाद सोडवत आपल्या अधिकाऱ्याची सुटका केली. पारनेर नगरपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली.
नवनिवार्चित नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे समर्थक विजय सदाशिव औटी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोग यांना मारहाण केली.
नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. सुजाता कुमावत धावून आल्या. वाद सोडविताना डॉ. कुमावत यांनाही धक्के बसले. शेवटी दोघांच्या मध्ये येऊन हाताचे कडे करून कुमावत यांनी हे भांडण सोडविले.यासंबंधी अद्याप पोलिसांकडे फिर्याद देण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार नगरपंचायतीच्या कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

नायलॉन मांजा विकल्यास अडीच लाख रुपये दंड! उच्च न्यायालयाचा निर्णय

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप

लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर-जानेवारीचे हप्ते अडकले, सरकारच्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित

फडणवीस 'देवभाऊ' नाहीत तर ''टक्काभाऊ' आहेत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्त पडिक्कलने 600 धावांचा टप्पा ओलांडून इतिहास रचला

पुढील लेख
Show comments