Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे विभागीय सरचिटणीसांना विदेशातून धमकी

Webdunia
गुरूवार, 5 मे 2022 (21:47 IST)
मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांना विदेशातून धमकीचा फोन आला आहे. मनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळेच हा धमकीचा फोन आल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. हा फोन परदेशातील क्रमांकावरून आल्याचं वैभव खेडेकर यांनी सांगितलं आहे.
 
याबाबत ते खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. सुमारे 11 मिनिटे त्या व्यक्तीने खेडेकर यांच्यांशी फोनवर बोलला. यावेळी त्याने वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. वैभव खेडेकर यांनी महाआरती आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं होतं. यामुळेच धमकी देणारा फोन आल्याच त्यांचं म्हणणं आहे.
 
कोण आहेत वैभव खेडेकर
 
मनसेचे कोकण विभागीय वैभव खेडेकर हे सरचिटणीस आहेत. यापूर्वीही ते अनेक कारणांनी चर्चेत आले आहेत. एखादं आक्रमक आंदोलन किंवा एखाद्या अधिकाऱ्याला मनसे स्टाइलनं दिलेला झटका यामुळे त्यांची चर्चा चांगलीच झाली आहे.
 
वैभव खेडेकर हे खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. मनसेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल महिन्यात खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं आहे. नगराध्यक्ष पदावर असताना नियमबाह्य काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

निवडणूक निकालापूर्वी नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

LIVE: विनोद तावडे यांनी राहुल-खर्गे यांच्या विरोधात कोर्टाची नोटीस बजावली

LIVE महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह कॉमेंट्री

व्हॉट्सॲप ग्रुपच्या मदतीने पत्नीची घरीच प्रसूती ! दाम्पत्याविरुद्ध FIR दाखल

पुढील लेख
Show comments