Festival Posters

'ती' मनीऑर्डर आली परत

Webdunia
मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (08:10 IST)
नाशिकमधील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकऱ्यांने लिलावासाठी आणलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्याने १०६४ रुपयांची मनीऑर्डरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. मात्र, आज नैताळे येथील पोस्ट कार्यालयात ही मनीऑर्डर परत आली. या मनी ऑर्डरवर पंतप्रधानांकडून वा कार्यालयाकडून स्वीकारण्याबाबत कुठलीही पोहोच पावती मिळून आली नाही. यामुळे साठे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. 
 
संजय साठे या शेतकऱ्याने शेतातील कांदा निफाड बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. क्विंटलमागे या शेतकऱ्याला १५१ रुपये भाव मिळाला. त्यामुळे रागाच्या भरात मिळालेल्या पैशाची पंतप्रधानांना मनीआर्डर करत निषेध नोंदविला.कांदा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला अवघे १ हजार ६४ रुपयांची पावती मिळाली. कांद्याला आलेल्या खर्चापेक्षा खूपच कमी पैसे मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने मिळालेली रक्कम निफाड पोस्ट ऑफिसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

महायुतीला महापालिका निवडणुकीत मोठा विजय;पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले

रोमांचक उपांत्य फेरीत सात्विक-चिरागचा चिनी जोडीकडून पराभव

LIVE: महापालिका निवडणुकीचे निकाल 'फिक्स्ड' संजय राऊतांचा आरोप

IND W vs SL W: भारताने श्रीलंकेचा आठ विकेट्सनी पराभव केला

रेल्वे प्रवास महागणार

पुढील लेख
Show comments