rashifal-2026

Monsoon Update : यंदाचा पाऊस कधीपासून येणार?

Webdunia
मंगळवार, 23 मे 2023 (10:26 IST)
राज्यात अवकाळी पावसानंतर मे पाहिल्यात चांगलाच उकाडा जाणवत आहे. तापमान 40 अंशावर आहे.तर खान्देश आणि विदर्भात तापमान 44 अंशाच्या पुढे असून नागरिकांना हिट चा तडाखा बसत आहे.  उकाड्या पासून वाचण्यासाठी यंदा पाऊस कधीपासून येणार हे वेध नागरिकांना लागले असून यंदाच्या पावसाबाबत हवामान खात्यानं अंदाज वर्तविला आहे. 
 
एप्रिल-मे महिन्यात प्रचंड उकाडा पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.  हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. पाऊस कधी पडणार याची वाट नागरिक बघत आहेत. यंदाचे मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच यंदाच्या वर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यंदा 10 किंवा 11 जून ला मान्सूनचे आगमन होणार अशी माहिती मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली. 

यंदा सरासरी 96 टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.राज्यात यंदा 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज वर्तवला आहे.मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल.
 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर बिश्नोई टोळीकडून भाजप नेत्याला धमकी

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; जीर्ण भिंत कोसळून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतून राजीनामा दिला, त्यांचा २३ वर्षांचा प्रवास उलगडला

धुळे जिल्ह्यात लग्न समारंभात रक्तरंजित हाणामारी, तीन जणांचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचांचा मृत्यू तर अनेक खेळाडू जखमी

पुढील लेख
Show comments