Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तो अश्लील व्हिडिओ पाठवत होता, मुंबई पोलिसांनी भारत-पाक सीमेजवळून अटक केली

Mumbai cops
Webdunia
वडाळा येथील एका महिलेला एका अनोळखी नंबरहून अश्लील व्हॉट्सअॅप मेसेज येत होते. त्या नंबरहून निरंतर अश्लील व्हिडिओ येणे सुरू राहिले तेव्हा महिलेने पतीकडे तक्रार केली.
 
पतीने अश्लील मेसेज करणार्‍याला थेट जाब विचारल्यावर तो म्हणाला मला असे व्हिडिओ पाठवायचे होते मी पाठवले आता जे करायचं असेल ते करा...यावर पतीने 5 जानेवारी रोजी वडाळा पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली. 
 
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान आरोपीने फोन आणि सिम कार्ड बदलल्यामुळे त्याला ट्रेस करायला अडचण येत असताना अखेर पोलिसांना यश मिळाले आणि  17 मे रोजी तो जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधील बाफ्लियाज गावात असल्याचं कळाले. मेहफूज मोहम्मद राशिद खान असं त्याचं नाव असून मुंबई पोलिसांनी थेट भारत-पाक सीमेजवळून त्याला अटक केली.
 
पुंछ सेक्टर संवदेनशील परिसर असल्यामुळे तेथील अधिकार्‍याची भेट घेऊन पोलिस पथक आरोपीच्या घराबाहेर दबा धरून बसलं होतं. 19 मे रोजी आरोपी दिसताच त्याला अटक करण्यात आली. 
राजौरी पोलिस स्टेशनाजवळ त्याच्या नातलगांनी जमाव गोळा करून अटकेला विरोध केला असतानाही मुंबई पोलिस आरोपीला घेऊन मुंबईत आले. आरोपीला न्यायालयात हजर केले गेले नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे महाराष्ट्र अर्थसंकल्पास बोगस म्हणाले

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी दिली प्रतिक्रिया

पालघर : तीन मुलांच्या आईने स्वतःच्या नवजात पुतण्याला चोरले, पोलिसांनी केली अटक

रुग्णवाहिका ट्रॅकवर अडकली, मालगाडीने रुग्णवाहिकेला धडक देत १०० मीटरपर्यंत ओढत नेले

थाटात साखरपुड झाल्यावर लग्न करण्यास दिला नकार, मुंबईत डॉक्टरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढील लेख