Marathi Biodata Maker

‘पद्मावत’ वादातून मनसेची माघार

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2018 (15:27 IST)

‘पद्मावत’ सिनेमाला संरक्षण देऊ अशी घोषणा केल्यानंतर आता करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेने यातून माघार घेतली आहे. पद्मावत चित्रपटाबाबत मनसेकडून अद्याप कुठलीही अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आलेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयानं हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकारनं काय ते बघावं. मनसेचा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पक्षाचे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी राज ठाकरे यांना काळं फासू असा इशारा दिला होता. त्यानंतर मनसेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 

त्याआधी मनसेच्या सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा (working president) शालिनी ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते. मनसेने 'पद्मावत'ला संरक्षणही देऊ. यापूर्वी आम्हीही अनेक चित्रपटांना विरोध केला. मात्र, हा विरोध मुद्द्यांवर होता. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच 'पद्मावत'ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

डिजिटल अटक घोटाळ्याविरोधात मोठी कारवाई, ९,४०० व्हॉट्सॲप खाती ब्लॉक, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खुलासा केला

LIVE: धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन

भाजपचा मोठा निर्णय, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाली

बुलढाण्यात तणाव, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

"मला मराठी येते, माझ्या रिक्षात येऊन बसा," रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी मनसेने 'स्टिकर मोहीम' सुरू केली

पुढील लेख
Show comments