Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ये शैतान मुझे तकलीफ दे रहा है'... म्हणत रुग्णाची हत्या

Webdunia
बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (14:18 IST)
सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयातून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयांमध्ये एका रुग्णाने दुसऱ्या वयोवृद्ध रुग्णाला सलाईनच्या लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याचा प्रकार घडला आहे. 
 
नेमकं काय घडलं?
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉक मध्ये गेल्या काही महिन्यापासून १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेघर असलेल्या ७० वर्षीय वृद्धाला उपचारासाठी दाखल केले होते. याच वॉर्डात फुप्फुसाच्या विकारावर इलाज करण्यासाठी युसूफ पिरजादे या रुग्णाला देखील दाखल करण्यात आले होते. काल रात्री याच युसूफ पिरजादेने सलाईन लावण्याचा लोखंडी स्टॅण्डने मारहाण ७० वर्षीय इसमाची हत्या केली आहे. मारहाण झाल्यावर वृद्धला उपचारासाठी ट्रॉमा केअर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बेघर रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
युसूफ मैलाली पिरजादे असं 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. युसूफ पिरजादे मागील 8 दिवसांपासून उपचार घेत होता तर उपचार सुरू असताना शुक्रवारी हा रुग्णालयातून पळून गेला होता. पण नातेवाईकांनी त्याला शनिवारी रात्री पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. दरम्यान, सोमवारी रात्री आठच्या सुमारास संबंधित मनोरुग्ण अचानक झोपेतून उठला आणि हातवारे करत म्हणत होता की 'ये शैतान है, मुझे तकलीफ दे रहा है'. वैद्यकीय कर्मचारी रुग्णाजवळ येईपर्यंत पिरजादेने जवळच असलेल्या सलाइन लावण्याच्या लोखंडी स्टॅण्डने बेघर वृध्‍द रुग्णावर हल्ला केला. त्याने रुग्णाच्या डोक्यात तीन घाव घातले. या भयंकर हल्ल्यात रुग्ण जागीच कोसळला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
दरम्यान रुग्णालयात एकच गोंधळ उडाला असून या धक्कादायक घटनामुळे हॉस्पिटल मधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

मुंबई बोट दुर्घटनेत शहीद झालेले नौदलाचे कमांडो महेंद्रसिंग राजपूत दोन महिन्यांनी निवृत्त होणार होते

शिवसेना आणि आरएसएस हे हिंदुत्वाच्या एका धाग्याने बांधलेले असले तरी वैचारिकदृष्ट्या वेगळे आहे म्हणाले संजय राऊत

LIVE: विभागांचे वाटप आजच होण्याची शक्यता म्हणाले संजय शिरसाट

शिवसेना आमदार शिरसाट म्हणाले फडणवीस सरकारमधील खात्यांचे वाटप आजच होणार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करीत मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली

पुढील लेख
Show comments