Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंपरी चिंचवड पुणे शहरातील ‘या’ केंद्रांवर गुरुवारी मिळणार ‘कोविशिल्ड’, कोव्हॅक्सिन’ची लस

Webdunia
गुरूवार, 8 जुलै 2021 (07:37 IST)
पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला व दुसरा डोस गुरुवारी मिळणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
 
अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 200 च्या क्षमतेने लस मिळणार आहे. कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
 
तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे.  8 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस ‘या’ 8 केंद्रांवर मिळणार !
 
प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ‘ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप’ या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे.
 
‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
 
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी या दोन केंद्रांवर 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार आहे. तर, निळु फुले नाट्यगृह सांगवी आणि स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल फुलेनगर या केद्रांवर 45 वर्षांपुढील नागरिकांना पहिला, दुसरा डोस 100 च्या क्षमतेने देण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मतदान केले

World Toilet Day 2024: जगभरात 3.5 अब्ज लोक मूलभूत स्वच्छतेशिवाय जगतात

कॅश फॉर व्होट प्रकरणात अहमदाबाद मधील एका तरुणाला ईडीने ताब्यात घेतले

शाळेत शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या, आरोपीला अटक

घाटकोपरमध्ये तीन पिढ्यांनी एकत्र मतदान केलं

पुढील लेख
Show comments