Marathi Biodata Maker

लॉकडाऊनसाठी नियोजन करा-मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Webdunia
रविवार, 28 मार्च 2021 (19:15 IST)
कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा असं आदेश मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या बैठकीत प्रशासनाला दिले आहेत. वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
 
दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढण्याची भीती टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. दरम्यान मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.
 
यासंदर्भात रविवारी आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.
 
मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इम्रान खान यांना त्यांची बहीण उज्मा यांनी आदियाला तुरुंगात भेट दिली

चौकीदार वादातून शरद पवार गटाच्या नेत्याला अटक

LIVE: चौकीदार वादातून शरद पवार गटाच्या नेत्याला अटक

मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, पीएमओचे नाव बदलून 'सेवातीर्थ झाले

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन

पुढील लेख