Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंकजा मुंडेंना धक्का ! वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते केले सील

Webdunia
शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:30 IST)
भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय यांनी केली आहे. दरम्यान बँक खाते सील करुन पीएफच्या थकबाकी 1 कोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्थापनेची मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46 लाख रुपये थकबाकी होती.थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी ही कारवाई केली.भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांत विरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
 
एकेकाळी वैद्यनाथ कारखाना आशिया खंडात नावाजला गेला. परंतु, मागच्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील काही दोष, कायम पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे याची बहिण आणि खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही.त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी राजीनामे सत्र सुरू केले होते. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments