rashifal-2026

कोकणात जोरदार पाऊस, रत्नागिरी जगबुडी नदीला पूर, रस्ता पूर्ण बंद

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:39 IST)
मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खेडमधील नारिंगी आणि जगबुडी पुलावरुन पाणी गेले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद केली. जगबुडीच्या पाण्याची पातळी आठ मीटरच्यावर असून, रात्री उशिरापर्यंत पाणी वाहत होते. त्यामुळे  दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अपघात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.  
 
रायगडमध्ये दासगावमध्ये दरड कोसळून महामार्ग सुमारे सात तास ठप्प होता. त्यात आता भर म्हणून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केली आहे. त्यामुळे धीम्या गतीने होणारी महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली. पावसाचा जोर वाढत गेल्याने खेड पोलिसांकडून जगबुडी पूल वाहतुकीस बंद केला आहे. अगदी काही काळ  एक-एक वाहन सोडण्यात येत होते. नदीत पाणी वाढल्याने पूर्णपणे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. एसटी बसच्या अनेक फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात किवा जवळपास जाणे सध्या टाळलेले गरजेचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

पुण्यातील कोयता गँगचा नायनाट करण्याचे अजित पवारांचे वचन

मुंबईत दहशत: टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी, बॉम्ब पथक तैनात

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

तरुणाने कुत्र्याला जबरदस्तीने दारू पाजली; आरोपीला अटक, व्हिडिओ व्हायरल

केंद्र आणि राज्यात भाजपशी युती तर महापालिका निवडणुकीत वेगवेगळे मार्ग का ? अजित पवार यांनी गुपित उघड केले

पुढील लेख
Show comments