Dharma Sangrah

तब्बल १८ दिवसांनंतर सदावर्ते यांची सुटका

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (21:39 IST)
महाराष्ट्रभर तुरुंगावारी करणारे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. तब्बल १८ दिवसांनंतर सदावर्ते यांची सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच सदावर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच, ही लढाई पुढे चालूच राहील, असं देखील सदावर्ते म्हणाले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. त्यानंतर राज्यभरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदावर्ते यांची महाराष्ट्रवारी सुरु झाली. पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, अकोला, सोलापूरपर्यंत गुन्हे नोंद झाले आहेत. दरम्यान, पुणे पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेणार होते. मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला.
 
न्यायालयाने सदावर्ते यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. पुण्यातील विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये मराठा समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक, दोन महिला पोलिस अधिकारी जखमी

महाराष्ट्रात 20 ठिकाणी एटीएसचे छापे

गडचिरोलीमध्ये एका 5 वर्षांच्या मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

मुंबईत कारच्या धडकेत एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू, अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

डोंबिवली पूर्वेतील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली, 29 दुचाकी जळून खाक

पुढील लेख
Show comments