Festival Posters

महावितरणचे आवाहन; धातूमिश्रित मांजा टाळा

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2017 (16:59 IST)

मकर संक्रांतीला महिनाभराचा कालावधी असला तरीही पतंगोत्सव साजरा करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. त्यातच वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात शहरातील दहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागण्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्च दाबाच्या वीज वाहिन्याफिडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेतअसे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र पतंग उडविताना उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह ग्रामीण भागात वीज वितरणासाठी लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले व युवकही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेकवेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतात. अतिउत्साही तरुण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीज तारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा दहा वर्षीय बालकाचा प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना धोक्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनांचे कोटिंग (आवरण) असल्याने वीज तारांच्या संपर्कात येताच या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावीअसे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतणारे ठरू शकते तसेच वीज वाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासंतास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावीअसे आवाहन महावितरणने केले आहे.

हे लक्षात ठेवा

वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जीवावर बेतू शकते.

वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टाहास करू नका.

वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका.

धातूमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा.

दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

सारा तेंडुलकरच्या हातात बिअरची बाटली धरलेला व्हिडिओ व्हायरल, युजर्स ट्रोल करत आहेत

Maharashtra Politics निकालापूर्वी भाजपचा विजय सुरू, ६ नगरसेवक बिनविरोध निवडून आले

धर्मांतराचे आरोप: अमरावतीमध्ये आठ जणांना अटक, केरळमधील एका पाद्रीचाही समावेश

नवीन वर्षाचा धक्का: व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १११ रुपयांनी महागले, तुमच्या शहरातील नवीनतम दर जाणून घ्या

आठवलेंच्या नाराजीनंतर, महायुतीने समेट केला; RPI ला १२ जागा मिळणार

पुढील लेख
Show comments