Festival Posters

सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंद

Webdunia
पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासनाने सफाळे रेल्वे फाटक सात दिवस बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर तेच फाटक कायमचे बंद होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सफाळे देवभूमी सभागृहातील बैठकीमध्ये सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी सफाळे रेल्वे फाटक 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत बंद होण्याबद्दल माहिती दिली. भविष्यात हे फाटक कायमचे बंद होण्याची चिन्हे आहेत. सुमारे 50 गावांपेक्षा अधिक गावे सफाळे बाजारपेठेची जोडली गेली आहेत. किंबहुना अनेक प्रवासी आणि नागरिक हे पूर्व व पश्चिम दिशेकडून फाटकातून ये-जा करत असतात. जर हे फाटक कायमचे बंद झाले तर येण्या-जाण्यासाठी सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास अधिकचा करावा लागणार आहे. कपासे येथील रेल्वे ओव्हर ब्रिज हा सध्याचा एकमेव मार्ग पूर्व व पश्चिम दिशेला जोडण्यासाठी आहे.
 
 फाटक कायमचे बंद होणार हे जरी विधीलिखित असले तरी त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णाप्रमाणे सुस्त असल्याचे दिसते. यासाठी स्थानिक आमदार व खासदारांनी लवकरात लवकर पुढाकार घेऊन पादचारी फुल किंवा भुयारी मार्ग अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे डीव्हीपीएसएस सफाळे कमिटीचे अध्यक्ष जतिन कदम यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी रूपाली चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर लाईनवर मेगा ब्लॉक लागू करण्यात येणार; ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान लोकल सेवा स्थगित

रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश

महाराष्ट्रातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द; एप्रिल ते जून दरम्यान जनगणनेचे काम होणार

टीम इंडियाची आणखी एका दौऱ्याची घोषणा; वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार

पुढील लेख
Show comments