rashifal-2026

धक्कादायक! मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता

Webdunia
बुधवार, 6 डिसेंबर 2023 (18:58 IST)
महाराष्ट्र राज्याची कायदा  सुव्यवस्था अधिक प्रगत आणि बलाढ्य करण्याची गरज असल्याचे दावे एनसीआरबी (NCRB Report)च्या ताज्या अहवालातून उघड झाले आहे. या अहवालानुसार राज्यात हिंसाचार आणि दंगलीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात सर्वाधिक दंगलीच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहे. 
एनसीआरबीच्या अहवालात सर्वाधिक दंगली आणि हिंसाचार घडणाऱ्या राज्याच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या  स्थानावर आहे. 

आता मुंबईतून धक्कादायक माहिती  मिळाली असून गेल्या 48 तासात नवी मुंबई येथून 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले असल्याचे समोर आले आहे. पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

सध्या मुंबईत अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 
गेल्या 48 तासांत नवी मुंबईतून कोपरखैरणे, कामोठे, पनवेल, कळंबोली, आणि रबाळे या परिसरातून 12 ते 15 वयोगटाची 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्यामुळे पोलीस प्रशासन च्या यंत्रणेवर मोठा प्रश्न उद्भवत आहे. अद्याप या मुलांचा शोध लागला नाही. बेपत्ता झालेल्या मुलांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मुलांचा शोध तातडीनं लावण्याची मागणी केली आहे. पोलीस या घटनेमुळे सतर्क झाले असून मुलांचा शोध घेण्यासाठी टास्कफोर्सची स्थापना केली असून मुलांचा शोध लावण्याचे कार्य सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

LIVE: मालेगाव न्यायालयाने संजय राऊत यांना दंड ठोठावला

नोएडामधील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; हाय अलर्ट जारी

तेलंगणात लज्जास्पद कृत्य, १५ माकडांना विष देऊन मारण्यात आले तर ८० जणांची प्रकृती गंभीर

बदलापूरमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्कूल व्हॅन चालकाला अटक

दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्राला मोठी भेट; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

पुढील लेख
Show comments