Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गिरीश महाजनांनी मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं, खडसेंचे गंभीर आरोप

Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (08:10 IST)
कधीकाळी एका पक्षात राहून सोबत काम करणाऱ्या एकनाथ खडसे  आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंबद्दल बोलताना त्यांच्यावर जहरी टीका केली. एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन ठीक नसून, पक्षाने त्यांना लायकी नसतानाही भरपूर दिलं अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप करताना गौप्यस्फोट केले आहेत. खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांची स्मरणशक्ती कमी झाली. गिरीश महाजन यांनी त्यांच्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावं, की त्यांनी निधीसाठी माझे पाय धरले की नाही? आपली लायकी आपणच ओळखायची असते. दुसऱ्यांनी सांगायचे नसते. माझ्या मागे लांगूलचालन करणारा गिरीश महाजन माझ्या आशीर्वादाने मोठा झाला. गिरीश महाजन यांना कोणी ओळखत नव्हतं, मी त्यांना मोठं केलं असं खडसे म्हणाले.
 
जामनेर हा मतदार संघ शिवसेनेचा होता. मी स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याकडे आग्रह केल्यानं जामनेर मतदार संघ भाजपाचा झाला. मग त्यांना भाजपकडून जामनेर मतदारसंघात तिकीट मिळालं. "प्रत्येकवेळी आर्थिक मदतीसाठी मला पैसे द्या, मला पैसे द्या, मला मदत मागायचां" असं म्हणत खडसेंनी टीका केली.
 
जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपचा पराभव झाला म्हणून त्यांचं मन विचलित झालं आहे. मला कमजोर करण्यासाठी भाजपाकडून गिरीश महाजन यांना नेतृत्व देण्यात आलं. आतापर्यंत माझी हाजी-हाजी करत होता. नंतर देवेंद्र फडणवीस यांची हाजी-हाजी करून त्यांना नेतृत्व मिळालं.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments