Dharma Sangrah

एका बापाचे असाल तर राजीनामे द्या’; संजय राऊतांचे बंडखोरांना आव्हान

Webdunia
सोमवार, 27 जून 2022 (09:48 IST)
मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. नेते शिवसेना सोडून जात आहेत पण शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर असल्याचे दिसून येत आहे.राज्यात शैवसिनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना  नेते पुन्हा संघटनात्मक बंदी मजबूत करण्यासाठी मुंबईत ठीक ठिकाणी मळावे घेत आहेत. शिवसेनेचा आज दहिसरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी उपस्थित होते. या मेळाव्यात संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना बंडखोर आमदारांवर टीका केली. “तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिंमत नाही.”, असे राऊत यावेळी म्हणाले.

“तुम्ही एका बापाचे असाल तर राजीनामे द्या. निवडणुकीला आमच्या समोर उभे राहा. नजरेला नजर भिडवून समोर या”, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले. यावरूनही संजय राऊतांनी बंडखोर आमदारांचा समाचार घेतला. “शिवसेनेला एकच बाप आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे”, हे पळून गेले त्यांचे जवळपास २० ते २५ बाप आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments