suvichar

राज्यात आणखी कडक लॉकडाऊन लागणार - राजेश टोपे

Webdunia
मंगळवार, 20 एप्रिल 2021 (18:36 IST)
राज्यात असलेला लॉकडाऊन आणखी कडक केला जाणार अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे. सध्या राज्यात जागोजागी नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं शेख यांनी सांगितलं. या संबंधातली नियमावली लवकरच राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात येईल.
 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील असलम शेख यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊन लावून राज्यातील नागरिकांचे लसीकरण व्हावे अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.
 
लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं. केंद्राकडे आम्ही जास्त ऑक्सिजनची मागणी केली आहे, असं ते पुढे म्हणाले.
 
दहावीच्या परीक्षा रद्द
दहावीच्या परीक्षा रद्द होणार असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही मागणी केली होती त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात असं ठरलं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. बारावीच्या परीक्षा मात्र होणार आहेत, असंही ते म्हणाले.
 
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं अंतर्गत मूल्यांकन करून त्यांनी पुढील वर्गात बढती देण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

गॅस काळाबाजार करणाऱ्यांना अटक, २३ गुन्हे दाखल-मंत्री छगन भुजबळ

LIVE: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सीसीटीव्हीमुळे महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments