Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली : देवेंद्र फडणवीस

Chief Minister expressed
, शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (15:56 IST)
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर फडणवीस म्हणाले, 'आजच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संभाजी भिडे गुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट