Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…

Webdunia
बुधवार, 14 एप्रिल 2021 (16:17 IST)
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत तरुणांच्या दक्षतेमुळे अलगत तोफखाना पोलिसांच्या हाती लागली आहे.पकडण्यात आलेल्या ती भामटी महिला कधी कोणाच्या तरी मोठ्या व्यक्तीची ओळख अथवा स्वतः वकील असल्याचे सांगून लिफ्ट देणाऱ्याला दमदाटी करून समोरील नागरिकांना पोलिस ठाण्याची भीती दाखवत शिवीगाळ, दमदाटी करून लुटीत असल्याची माहिती मिळाली होती. तोफखाना पोलीस ठाण्याचे पो.नि गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डिबीचे इन्चार्ज सपोनि समाधान सोंळके यांच्या सूचनेनुसार महिला पोलिस कर्मचा-यांनी सापळा लावून त्या भामट्या महिलेस पकडण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे कि गुढीपाडव्याच्या मंगळवारी (दि.13) रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास एक ग्रहस्थ आपल्या टेम्पोमध्ये फर्निचर सामान घेऊन नगर-मनमाड रोडने एमआयडीसीकडे जात होते. यावेळी झोपडी कँटीनसमोर टीव्हीएस शोरूम जवळ पांढऱ्या रंगाचा अॅप्रोन घालून ती भामटी महिला उभी होती.
 
या दरम्यान टेम्पोचालक पाणी पिण्यासाठी थांबलो असता, त्या भामट्या महिलेने संधी साधून त्या टेम्पाचालक गृहस्थाला मला हुंडेकरी शोरूमजवळ सोडा असे सांगितले, यावेळी टेम्पोमध्ये फर्निचर असल्याने टेम्पोच्या पुढील सीटवर ती भामटी महिला बसवली, यानंतर हंडेकरी शोरूम आल्याने त्या महिलेस उतारा असे टेम्पोवाला ग्रहस्थ म्हणाला.
यावेळी त्या भामट्या महिलेने मी कुणाच्या गाडीत फुकट येत नाही, असे म्हणून त्या महिलेने 500 रुपयाची नोट दाखवली. तेव्हा त्यावेळी त्या टेम्पोचालक गृहस्थाने 500 रुपये सुट्टी नसल्याचे त्याने सांगितले. यावर भामटी महिला त्या टेम्पोचालक गृहस्थाला म्हणाली, माझ्याकडील 200 रुपयाच्या तीन नोटा घ्या व मला 580 रुपये मागे दे, तेव्हा तो टेम्पोवाला गृहस्थ त्या महिलेस म्हणाला हा कोणता हिशोब आहे.
 
यावर त्या टेम्पोचालक गृहस्थाने त्या भामट्या महिलेस 20 रुपय भाडे द्या, असे म्हटले. यावर त्या भामट्या महिलेने त्या टेम्पो चालक गृहस्थाला म्हणाली ‘मी तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल मी कोर्टात क्लास वन अधिकारी आहे’, असे म्हणून पुन्हा टेम्पोत बसून डाॅन बाॅस्को पुलापर्यंत हुज्जत घातली.शिवीगाळ, दमदाटी करून त्या भामटे महिलेने टेम्पोचालक गृहस्थाकडून 1700 रुपये काढून घेतले. तर त्याच दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक गृहस्थ दुचाकीवरून त्याच रस्त्याने जात असताना त्या भामटे महिलेने त्या गृहस्थाकडे लिफ्ट मागून दुचाकीवर बसली. त्याचा रस्तावर दमदाटी करून त्याकडून 1500 रुपये काढल्याची घटना घडली.या भामट्या महिलेने लिप्ट मागून लुटल्याच्या अनेकांनी मिडियाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु बदनामी भीतीमुळेच त्या संबंधितांनी पोलिस ठाण्यात आपल्याला लुटल्याच्या तक्रारी दिल्या नाहीत. पण काही जागृत तरुणांमुळे ती भामटी महिला तोफखाना ‘डिबी’ पथकाने पकडली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments