rashifal-2026

मजुरांची नोंदणी करण्याची राज यांची सूचना राज्य शासन प्रत्यक्षात उतरवणार

Webdunia
शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (16:05 IST)
लॉकडाऊनमध्ये परराज्यात गेलेले स्थलांतरित मजूर परतल्यावर त्यांची नोंद करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी केली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेक मजूर परतले पण त्यांची नोंद झाली नाही. दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर मजूर पुन्हा एकदा आपल्या गावी गेलेयत. दरम्यान या मजुरांची नोंद ठेवावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी झालेल्या बैठकीत दिलेयत.  
 
मजुरांची नोंदणी करण्याची राज ठाकरे यांची सूचना राज्य शासन प्रत्यक्षात उतरवणार आहे. गेल्यावर्षी राज ठाकरे यांनी ही सूचना केली होती, मात्र त्याकडे राजकारण म्हणून पाहिलं गेलं. आता कोरोना वाढल्यावर सरकारला हे पुन्हा सुचलं हे चांगलं आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय. 
 
सध्या अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. पुढे  संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महायुती युतीबाबत सस्पेन्स कायम, 17 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरातील सुरक्षा वाढवण्यात आली

मदत साहित्य घेऊन जाणारे विमान तलावात कोसळले, दोघांचा मृत्यू

LIVE: वणीमध्ये ठाकरे बंधूंच्या एकतेची झलक; एकत्र महापालिका निवडणुका लढवणार

श्रीलंका मालिकेपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या घरावर गोळीबार

पुढील लेख