Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकीलांनी दिली 'ही' धक्कादायक माहिती

Webdunia
बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:01 IST)
अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत सरकारी वकीलांनी मोठा खुलासा केला आहे. सदावर्ते यांच्या घरात चक्क नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांकडून सदावर्ते पैसे उकळत असल्याचेही निदर्शनास आले आहे. यासंदर्भात सदावर्ते यांच्याकडील हिरव्या रंगाच्या वहीमध्ये यासंदर्भात नोंदी आढळून आल्या आहेत. त्यात नमूद केले आहे की राज्यातील २५० डेपोंमधून सदावर्ते पैसे गोळा करायचे.
 
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने त्यांची न्यायालयात बाजू मांडण्याचे काम सदावर्ते करीत होते. एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशातूनच सदावर्ते यांनी भायखळा आणि परळ येथे प्रॉपर्टी तर एक आलिशान कारही खरेदी केल्याचा संशय आहे. सदावर्ते यांच्या घरात नोटा मोजण्याचे मशीन सापडले आहे. विशेष म्हणजे, वकीलाच्या घरी असे मशीन असण्याचे काहीच कारण नाही. तसेच, त्यांच्या घरात काही संशयास्पद कागदपत्रे आढळली असल्याने त्यांची सखोल चौकशी होण्यासाठीच पोलिस कोठडी मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे घरत यांनी म्हटले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर… शाहरुख खानच्या डायलॉगवर समीर वानखेडेची प्रतिक्रिया

घराला आग लागून गुदमरल्याने सहा जणांचा मृत्यू

LIVE: मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ युतीवर नाराज, महायुती सोडणार!

मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ युतीवर नाराज, महायुती सोडणार!

पुण्यात दुचाकित सीएनजी भरताना भीषण अपघात, कर्मचाऱ्याने डोळा गमावला

पुढील लेख
Show comments