Marathi Biodata Maker

लातूरकर दुष्काळाच्या लढ्यासाठी सरसावले ‘जलाग्रही लातूर’ चळवळ सुरु

Webdunia
सोमवार, 10 जून 2019 (16:42 IST)
सतत गंभीर दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या लातूर शहरात शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकमात्र पर्याय असणाऱ्या उजनीचे पाणी मिळविण्यासाठी लातूरकर एकवटले आहेत. त्यांनी ‘जलाग्रही लातूर’ या सर्वसामान्य लातूरकरांनी उभारलेला राजकीय उपक्रम जोरदार पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे कोणाचाही राजकीय चेहरा नसताना सामान्य लातूरकरांनी दाखवलेला सहभाग यामध्ये अभूतपूर्व आहे. उजनीचे पाणी लातूरला मिळावे याची निवेदन लातूरकरांच्या वतीने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय जनशक्ती मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांना पाठवण्यात आले आहे. जलाग्रही लातूरच्या वतीने सामान्य लातूरकरांना एकत्रित करून उजनीच्या पाण्याकरिता आग्रही भूमिका घेण्यात येत असून, यामध्ये सर्वसामान्य लातूरकर सहभाग घेताना दिसून येत आहेत.
 
याच अनुषंगाने अष्टविनायक हॉल येथे पार पडलेल्या व्यापक बैठकीत आदोलानाची पुढील दिशा ठरविण्यात आली. केवळ घोषणा होईपर्यंत नव्हे तर ठोस कारवाई होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे. यासोबत  महानगरपालिकेच्या वतीने उजनीचे पाणी मिळविण्यासाठी ठराव घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकरांनी शक्य त्या मार्गाने केंद्र शासन व राज्य शासना पर्यंत आपली मागणी नोंदवून सकारात्मक दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या आंतरराष्ट्रीय केंद्राला भेट दिली

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला नवीन वाहने मिळणार; मुख्यमंत्र्यांसाठी अत्याधुनिक बुलेटप्रूफ कार खरेदी केली जाणार

LIVE: दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी तीन नवीन वाहने खरेदी केली जाणार

अशोक खरात प्रकरणात चार मंत्री अडकले; नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली

कॅबिनेट मंत्री सुधाकर यांचे निधन

पुढील लेख
Show comments